Tuesday, October 23, 2012

संत कबीर

साई इतना दिजीये, जा में कुटुम समाये

मै भी भूखा न रहू, साधू न भूखा जाय

कबीर हा एक मनस्वी माणूस होता हे मी खात्रीशीररित्या म्हणू शकतो. कबीराच्या 

प्रत्येक दोह्यामध्ये त्याच्या खरेपणाची आणि मनस्वीपणाची झलक दिसते. 

प्रत्येकाच्या हृदयाला सहज जाऊन भिडेल अशा पद्धतीने कबीर स्वत:ला व्यक्त 

करायचा.

या दोह्यात कबीर ईश्वराला आळवणी करतोय. तो सांगतो की हे ईश्वरा मला इतकं 

भरभरून दे की ज्यामध्ये मी पूर्णपणे स्वत:ला सांभाळू शकेन. इतकं दे की माझी 

शारीरिक भूक तर भागेलच पण माझ्या आतल्या खऱ्या ‘माझी’, माझ्या 

आत्म्याचीसुद्धा भूक भागेल.

हे एक आत्यंतिक विशुद्ध असं मागणं आहे. केवळ शारीरिक भूक न भागवता 

आत्म्याची खरी अशी सद्सद्विवेकाची भूक भागेल इतका विवेक मला दे अशी आर्त 

मागणी कबीर करतो. इथे साधू म्हणजे कबीराला स्वत:च्या आतलं मूळ स्वरूप 

अपेक्षित आहे.

कबीराच्या अनेक दोह्यातून तो एक उच्च कोटीचा माणूस होता, खराखुरा संत होता 

याची वारंवार प्रचीती येते.

No comments:

Post a Comment