सध्या मी सकाळी
रोज पेपर हाती घेतला की एक बातमी अगदी नक्की असते, ती म्हणजे बलात्काराची ! एकदा
पुण्यात तर कधी मुंबई, दिल्ली, मध्यप्रदेश, कर्नाटक तर कधी कुठे अन् कधी कुठे. हे
बलात्कार करणारे कोण तर कधी विशीचे, कधी चाळीशीचे तर कधीकधी अगदी साठीचेसुद्धा !
हे नृशंस,
नराधम, षंढ, नालायक, बेमुर्वतखोर, पापी पशू बलात्कार कोणावर करतात, तर कधी एखाद्या
तरुणीवर, एखाद्या मध्यमवयीन स्त्रीवर तर कधी अगदी त्यांच्या आजीच्या वयाच्या
स्त्रीवर आणि या साऱ्यावर कळस म्हणजे कधी अगदी ४-५ वर्षाच्या चिमुकलीवर...!! अगदी
हे लिहीत असतानासुद्धा अंगावर काटा येतोय. ज्या मुलीने नुकताच जग बघायला सुरुवात
केलीये, आपल्या छोट्याश्या हातांनी सारं जग कवेत घ्यायची ज्या छकुलीने स्वप्न
पाहायला सुरुवात केलीये, जिच्या चमकणाऱ्या डोळ्यांमध्ये आई-बाबांनी उद्याच्या उज्ज्वल
भविष्याची स्वप्न पाहिलेली असतात अशा न उमललेल्या काळ्या खुडायचा हक्क या
नराधमांना दिला कोणी???
कोणासोबत sex करायचं ही कोणात्याही स्त्रीची अगदी वैयक्तिक आणि नाजूक अशी गोष्ट असते. तिची
इच्छा नसतांना केवळ आपल्यातल्या पाशवी बाळच्या वापराने त्या स्त्रीवर अतिप्रसंग
करणे यासारखे दुसरे पाप कुठले नसावे.
असा राग येणं हे जरी अगदीच स्वाभाविक असलं तरी यावर उपाय काय करावा याबद्दलच्या चर्चा ऐकल्यात तर मात्र याबद्दल आपण किती उथळ विचार करतो आहोत हे लक्षात येतं. अशा गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी इथपासून ते त्यांचे अवयव कापून टाकावेत इथवर या चर्चा जातात. परंतु शिक्षेच्या बाबतीतील global trends जर आपण पाहिलेत तर असं लक्षात येतं कि deterrent theory of punishment म्हणजेच एका गुन्हेगाराला कठोर शिक्षा केली कि आपोआप इतरांना धाक बसून ते गुन्हा करायचे टाळतात, या theory चं अपयश दिसून येत.
अशा गुन्ह्यांना खरोखरीच जर आळा घालायचा असेल तर reformative theory of punishment हाच योग्य मार्ग दिसतो. जोवर गुन्हेगाराला झालेल्या चुकीचा पश्चाताप होत नाही तोवर खर्या अर्थाने न्याय झाला अस म्हणण धाडसाच ठरेल. याचा अर्थ कोणतीच शिक्षा असू नये असा मुळीच नाही. किंबहुना law and order authority ने आपले काम करत राहायलाच हवे.
मात्र ते necessary असले तरी sufficient नक्कीच नाही. नाहीतर India's Daughters सारख्या documentaries मधून गुन्हेगारी मानसिकता अशीच दिसत राहील. शिक्षा ही केवळ एका व्यक्तीला दिली जाते. मात्र जो गुन्हा तो करतो त्याला केवळ तो जबाबदार नसून एक खूप मोठी व्यवस्था जबाबदार असते. आणि या सामाजिक व्यवस्थेमध्ये योग्य ते बदल घडवणे खूप महत्वाचे आहे.

No comments:
Post a Comment