नुकताच लागलेला पूर्वपरीक्षेचा निकाल आणि 50 पेक्षा कमी दिवस राहिले असल्यामुळे परिक्षार्थींच्या
अभ्यासाला चांगलीच गती आलेली असेल. परंतु याचवेळी काही प्रश्न आणि शंका मनात घर
करून बसलेल्या असतात. त्यापैकी काही common प्रश्नांची
उत्तरे जशी मला माझ्या अभ्यासाच्या प्रवासात उमगली तशी सांगायचा एक प्रयत्न.
Strategy:अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी अभ्यासक्रम आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका यांचा सखोल अभ्यास करणं अत्यावश्यक आहे. राज्यसेवची preliminary परीक्षा जेवढी unpredictable आहे तितकीच मुख्य परीक्षा predictable आहे. मागील 5 वर्षांच्या प्रश्नपत्रिका नीट अभ्यासाल्या तरी 15-20% अभ्यास पूर्ण होतो. आणि बाकीच्या अभ्यासाला दिशा मिळते ती वेगळी.
Strategy:अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी अभ्यासक्रम आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका यांचा सखोल अभ्यास करणं अत्यावश्यक आहे. राज्यसेवची preliminary परीक्षा जेवढी unpredictable आहे तितकीच मुख्य परीक्षा predictable आहे. मागील 5 वर्षांच्या प्रश्नपत्रिका नीट अभ्यासाल्या तरी 15-20% अभ्यास पूर्ण होतो. आणि बाकीच्या अभ्यासाला दिशा मिळते ती वेगळी.
पुण्यातील विविध classes आणि post-holders यांनी अभ्यासक्रमातील सर्व घटकांवर पुस्तके काढून sources चा प्रश्न सोडवला असला तरी एकाच विषयाची अनेक पुस्तके उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो. आणि त्यांचा बराच वेळ कोणतं पुस्तक वाचावं याचा विचार करण्यातच जातो. तसेच एक पुस्तक घेतल्यावर आपण दुसरे वाचत नसल्यामुळे नुकसान तर नाही होणार ना अशी भीती कायम राहते. त्यामुळे असे आढळून येते कि विद्यार्थी एकाच विषयाचा 3-4 पुस्तकांमधून अभ्यास करतात. परंतु त्यामुळे विषयाबद्दल clarity न येता confusion जास्त होते. त्यामुळे एकाच विषयाची 3 पुस्तके ना वाचता एकच पुस्तक 3 वेळा वाचणेे जास्त फायदेशीर ठरते. Objective प्रकारचे प्रश्न असल्यामुळे कोणतेही पुस्तक घेतले तरी basic गोष्टी त्याच असतात त्यामुळे 90% content सारखाच असतो. त्यामुळे तुम्हाला वाचायला चांगले वाटेल असं एक पुस्तक घेऊन त्याच्या 3-4 revisions केल्या तरी पुरेसा आहे. अभ्यासक्रमातील एक गोष्ट एकाच source मधून वाचणं योग्य. एका source च्या 4 revision नंतर तुम्ही दुसरे पुस्तक चाळायला हरकत नाही. त्यातून काही सुटलं असेल तर ते या दुसऱ्या source मधून गोळा करतायेईल.
Booklist:
EFFECTIVE AND EFFICIENT STUDY
Booklist:
EFFECTIVE AND EFFICIENT STUDY
स्वतःच्या क्षमता आणि परिक्षेची demand या गोष्टी आपल्याला नीट समजल्या असतील तर अभ्यास प्रभावी होतो. आपल्याला काही विषयात गती असते तर काही विषय अवघड जातात. जे विषय सोप्पे जातात त्यात जास्तीत जास्त गुण मिळावे असा अभ्यास करायचा. आणि अवघड विषयातील सर्वांना येतील असे सोप्पे प्रश्न तरी आपल्याला यायला पाहिजेत किमान एवढातरी अभ्यास करावा. तो विषय पूर्णपणे टाळू नये.
आयोग अभ्यासक्रमातील काही भागावर जास्त प्रश्न विचारतो तर काही भागांवर अगदीच नगण्य. त्यामुळे मागील प्रश्नपत्रिकांचे analysis करून कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा हे ठरवावे. उदाहरणादाखल- इतिहास आणि भूगोल यावर साधारणपणे 65 व 55 प्रश्न विचारले जातात. इतिहासाचे अनेक प्रश्न बऱ्याचदा आवाक्याबाहेरचे असतात परंतु भूगोलाचे प्रश्न मात्र ठरलेलेच येतात. अशावेळी भूगोलावर जास्त मेहेनत केलेली परवडते. तसेच मराठी आणि इंग्रजी व्याकरण यात 100 पैकी 70 मार्क्स मिळवणे शक्य आहे. त्यामुळे त्याला जास्त वेळ देणे योग्य ठरेल. बहुतेक विद्यार्थ्यांना GS-III ची भीती वाटते. परंतु हा विषय अभ्यास करण्यास सगळ्यात सोप्पा आहे कारण एकाच पुस्तकात यातील बराच अभ्यासक्रम cover होतो आणि प्रश्न विचारायचा pattern देखील ओळखता येतो. महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास तसेच सुदूर संवेदन या विषयांचा कितीही अभ्यास केला तरी परीक्षेत काय येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे यावर गरजेपेक्षा वेळ घालवणे चुकीचे ठरेल. तसेच अगोदर वाचून notes काढल्या नसतील तर शेवटच्या 50 दिवसात yearbook वाचणे जास्त फायदेशीर ठरत नाही. तेंव्हा त्याच्या नोट्स मिळवणे योग्य ठरते.
TIME MANAGEMENT:
राज्यसेवा ही objective type प्रश्नांची परीक्षा असल्यामुळे खूप खोल विश्लेषण किंवा वेगवेगळी मते यांची जास्त गरज नसते. त्यामुळे factual गोष्टींवर भर देऊन वेगाने वाचत पुढे जाणे योग्य. "चांगला अभ्यास करतो", "नीट अभ्यास करतो" या नावाखाली बरेच जण वेळकाढूपणा करतात. म्हणून मग कमी वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे target ठेऊन अभ्यास केलेला बरा.
या संकल्पनेनुसार पुढील 50 दिवसांचे नियोजन काहीसे पुढीलप्रमाणे होईल. 20 दिवसांची एक rivision, ज्यात प्रत्येकी 4 दिवस एका GS पेपर ला आणि उरलेले 4 दिवस मराठी इंग्लिश व्याकरण यासाठी. परंतु या revision मध्ये जो भाग preliminary परीक्षेला नसलेला आणि ज्याचा अगोदर खूप अभ्यास नाही केला अशा गोष्टींना जास्त वेळ द्यावा. जसे कि महाराष्ट्राचा भूगोल, मानव संसाधन इ. इथून पुढच्या 2 revisions 15-15 दिवसाच्या. म्हणजे प्रत्येक पेपर साठी 3 दिवस.
हा वेळ जरी कमी वाटला तरी परीक्षेची गरज पाहता पुरेसा आहे. कमी वेळेत अभ्यासाचं target ठेवले तरच आपण नेमक्या गोष्टी करू, अन्यथा अनावश्यक गोष्टी पण वाचल्या जातात आणि clarity पण कमी होते आणि confusion वाढते. ज्या परीक्षेत 150 पैकी 50 प्रश्न पक्के माहिती असणं खूप समजलं जातं तिथे clarity असणं खूप महत्वाचं ठरतं. तिथे अभ्यास नेमका आणि कमी असणे फायदेशीर ठरते. तसेच कमी वेळेत जास्त गोष्टी वाचल्यानंतर interlinkages तयार होतात ते वेगळे. म्हणून मग सगळा अभ्यासक्रम 30 दिवसात एकदा पूर्ण करण्यापेक्षा, 15 दिवसात एकदा अशा दोन revisions करणे योग्य ठरते.
Attempt किती करायचा??
क्लास 1 साठी 140 attepmt ला पर्याय नाही. फक्त पास व्हायचे असेल तर attempt कमी चालतो परंतु पहिल्या 30 मध्ये यायचं तर attempt जास्तच करावा लागतो. माहिती नसलेल्या प्रश्नामधील पण 4 पैकी 1 बरोबर येतोच. त्यामुळे नुकसान बहुदा होत नाहीच. त्यामुळे जास्तीत जास्त attempt करावाच.
प्रत्यक्ष परिक्षेदिवशी काय करावे-
परिक्षेदिवाशी किंवा 1 दिवस अगोदर सगळा अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य नसते तेंव्हा तसा प्रयत्नही करू नये. खूप गोष्टी करायच्या प्रयत्नात अगोदर केलेल्या गोष्टी पण विसरण्याची शक्यता असते. डोके स्थिर असेल तर गोष्टी आठवणे सोप्पे जाते. त्यासाठी परिक्षेदिवाशी खूप ताण येणार नाही असा अभ्यास करावा. म्हणून पूर्ण अभ्यासक्रम न वाचता अगोदर काढलेल्या short notes किंवा एखादा घटक अभ्यासने उपयुक्त ठरते.
परीक्षेच्या काळात जास्त चर्चा करणे टाळावे. वाचायच्या राहिलेल्या गोष्टींबद्दल जास्त विचार करत बसू नये. जे राहिलाय त्यापेक्षा काय केलयं यावर जास्त लक्ष दिलेले बरे असते.
पेपर च्या 2 तासांचे अर्ध्या अर्ध्या तासाचे 4 भाग करून त्याप्रमाणे नियोजन करावे. प्रत्येक अर्ध्या तासात किती प्रश्न सोडवायचे याचे गणित पक्के करावे. 2 तासात 150 प्रश्न सोडवायचे असल्याने 2 वेळा सगळे प्रश्न वाचणे शक्य होत नाही. त्यामुळे पहिल्या वाचनातच शक्य तितके प्रश्न सोडवावेत. ज्या उत्तराबद्दल शंका असतील त्याही प्रश्नाचे तुम्हाला योग्य वाटते ते उत्तर प्रश्नपत्रिकेत मार्क करून ठेवा. वेळ मिळाल्यास त्याचा पुर्नविचार करा परंतु मार्क न करता पुढे जाऊ नका. मराठी इंग्रजीच्या लेखी(descriptive) पेपरला वेळेचे नियोजन अतिशय महत्वाचे आहे. कोणत्याही प्रश्नावर गरजेपेक्षा जास्त वेळ जाऊ देऊ नये अन्यथा दुसरा प्रश्न अर्धवट राहतो आणि त्याचा गुणांवर खूप फरक पडतो. लेखी पेपर पूर्ण सोडवून होणे अतिशय गरजेचे आहे.
वरील सगळ्याव्यतिरिक्त महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवरच
विश्वास आणि स्वतःच्या पद्धतीवर असलेला विश्वास. तो असेल तर सगळ्या गोष्टी जमून
येतात.
I hope all this helps. All the best.
I hope all this helps. All the best.
Shabas Amol ! All important tips covered !! Very apt and useful !
ReplyDeleteThank you Sir.-Amol
ReplyDeletesir khupach chhan guide kelay.....
ReplyDeleteHow to prepaer for languages papers???
ReplyDeletePlz share ur stretegy
Will try to publish dedicated article for language papers soon
DeleteThank u sir.....!
ReplyDeleteplease guide me for MPSC as I am from CBSE English medium reading marathi after a 9 year gap as i had it only fro 5th to 8th standard.
ReplyDeleteMy question is same as the previous question asked..suggest us booklist for giving mpsc in eEnglis medium.
ReplyDelete