Tuesday, May 31, 2011

प्रेम..


माणूस एक मोठ अजब रसायन आहे. कधी स्वार्थासाठी आत्यंतिक टोकाला जाणारा हाच माणूस कधी प्रेमापोटी सर्वस्व सुद्धा त्यागायला तयार होतो.
                            
सगळ्याच गोष्टी नैतिक आणि अनैतिक या दोनच बंधनात बसत नाहीत. तस असत तर, कृष्णाच्या कृष्णलीला या अनैतिक ठरल्या असत्या... परंतु आलम दुनिया फक्त नैतिक अन अनैतिकतेच्या तराजूमध्ये मोजून नाही चालत !
                              
यापेक्षाही अजून एक मोठ अधिष्ठान असतं, प्रेमाचं.. बऱ्याचशा गोष्टी या प्रेमावर चालतात.
                
‘प्रेम’, हा शब्दच मोठा गोड आणि प्रेमळ आहे! जीवनाची सगळी गोडी त्याच्यात आहे. प्रेम म्हणजे अंतरीची भाषा, मनाचा मनाशी संवाद... प्रेम म्हणजे खरोखरच आयुष्य, वाळवंटातील हिरवळ जणू! प्रेमाशिवाय माणूस जगूच शकत नाही. “Love is the most lovable thing in the world” असं म्हणतात.
                 
परंतु दुर्दैवाने प्रेमासारख्या इतक्या नाजूक भावनेचा खुपच मर्यादित अर्थ आजच्या दुनियेत घेतला जातो. क्षणभंगुर असलेले शारीरिक आकर्षण म्हणजे प्रेम नव्हे. फक्त नर आणि मादी यांच्यातच प्रेम असतं असा चुकीचा समज पसरायला लागलाय. खर प्रेम ठरवून थोडं होत.. ते तर एखाद्या निर्मळ झऱ्यासारखे असते.. वाट मिळेल तिकडे सहजपणे वाहत जाते. ठरवून प्रेम होऊच शकत नाही. फारतर ठरवून करार होऊ शकतो मात्र प्रेम नव्हे.

प्रेमाचे किती निर्-निराळे प्रकार! आईचं मुलावर, भावच बहिणीवर, शेतकऱ्याच आपल्या गायी-गुरांवर, प्रेयसीच प्रियकरावर..कितीतरी हे प्रेमाचे प्रकार. खऱ्या प्रेमात द्वेष नसतो. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो तिने  सुद्धा आपल्यावर प्रेम करावे हा अट्टहास तिथे नसतो. तिथे असतं ते केवळ निरपेक्ष प्रेम, कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न करणार. त्यामुळे आजच्या युगातले ‘प्रेयसीने लग्नाला नकार दिल्याने तिला जाळले’ सारखे प्रकार अतिशय दुर्दैवी आहेत.
                 
प्रेमामुळे माणूस अधिक समर्थ होतो. परंतु आपल्याकडच्या अनावश्यक अशा अनेक बंधनामुळे हे प्रेम खुलेपणाने कारण शक्य होत नाही. बघा न किती विचित्र आहे, ज्या व्यक्ती आपल्याला आवडत नाहीत त्या आपण खुलेपणाने सांगतो, मात्र ज्यांच्यावर आपण प्रेम करतो, ज्या व्यक्ती आपल्याला आवडतात त्या मात्र कधी खुलेपणाने सांगत नाहीत. अशा या भित्र्या प्रेमाला कुसुमाग्रज सांगतात,
                       " मोरासारखा छाती काढून उभा राहा
                        जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा
                        सांग तिला.. तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा
         उधळू दे तूफान सार
        काळजामध्ये साचलेल
        प्रेम कर भिल्लासारखं
        बाणावरती खोचलेलं.”
                असं हे प्रेम..वनवा होऊन जाळत राहणं अन् जंगल होऊन जळत जाण्... अगदी निरागस अन् तितकाच परिपक्व... अगदी कोमळ अन् तितकच कठोरसुद्धा..                                

No comments:

Post a Comment