आठवते का ती रात्र तुला?
कोजागिरीच्या चंद्राचं प्रतिबिंब तुझ्या लांबसडक केसांवर पडलं होत
तुझा मुळातला चंद्राळू चेहरा अधिकच तजेलदार झाला होता
तुझे प्रेमळ ओठ अधिकच पिवळसर लाल झाले होते
चांदणं तुझ्या नाजूक गालांवर झिरपत होत...
मंद वारा आपल्याच खुशीत वाहत होता
त्याच्यासोबत तुझ्या केसातला चन्द्रसुद्धा भुरभुरत होता...
कोणीच बोलत नव्हतं,
तू एकटक एका काजव्याकडे बघत होतीस अन् तोसुद्धा तुझ्याकडे
मी मात्र माझ्या चंद्राकडे पाहत होतो
किती स्वच्छ अन् शुभ्र होता नाही चंद्र...?
अचानक तो काजवा दिसेनासा झाला अन् तू माझ्याकडे वळलीस,
मी मात्र चंद्राच्या चांदण्यात ओला झाल्याने कुडकुडत होतो..
एकदम तुझ्या केसांची एक बट माझ्या गालांवर येऊन पहुडली.
ती पहुडली अन् मी मात्र जागा झालो
तू मुग्धपणे मला कुरवाळलसं... मी नि:शब्द होतो
मी नि:शब्द म्हणजे तू पण शब्दशांत
तुझ्या चंद्राळू चेहऱ्याच्या प्रकाशात माझं कोरं मन वाचताना पाहिलं मी तुला
तू गझलभर माझ्यावर प्रेम केलसं, आता चांदण्याच्या ओलाव्यातसुद्धा मी कुडकुडत नव्हतो
अचानक पाऊस सुरु झाला..छत्री उघडून चालू लागलो...मी अन् तू...तू अन् मी,
छत्री लहान होती, तरी आपण दोघपण ओले नाही झालोत
आपण ‘दोन’ होतो तेव्हा?
खांद्यावारल्या तुझ्या हातातली अंगठी जाणवत होती मला
छतांवाराची टपटप अन् हृदयांची धडधड किती एकताल होते नाही?
आता चालत चालत बरच दूर आलो होतो आपण
रस्ता तसा चांगला होता कारण तुझी साथ होती
आता समोर अथांग समुद्र दिसत होता...
अरेच्चा! जेथून निघालो हा तर तोच समुद्र
मी म्हंटल जाऊ आता आत
आता मात्र तू 'तो' चंद्र होतीस पहात!!!
No comments:
Post a Comment