काल एका समेलनामध्ये मी गेलो होतो. अनेक कवी, साहित्यिक आपले विचार तिथे अगदी आरडओरड करून मांडायचा प्रयत्न करत होते. एका कवी महोदयांनी आपल्या अयशस्वी प्रेमाची कहाणी कवितेमधून मांडली. त्यानंतर प्रेम म्हणजे फक्त व्यापार कसा हे त्यांनी समजावून संगीताले. प्रेम वगैरे काहीच सत्य नाही तर प्रत्येक व्यक्ती स्वार्थासाठी जगतो हेसुद्द्धा त्यांनी सांगितले.
त्यानंतर यावर बरीच चर्चा झाली. बऱ्याच राथी-महारथींनी खरोखरच प्रेम निरर्थक कसे ते सांगितले. कोणताही व्यक्ती दुसऱ्यावर फक्त काहीतरी स्वत:च्या फायद्यासाठी प्रेम कारातोकरू शकतो, ती मनुष्याची स्वाभाविक पद्धती आहे अस सर्वसाधारण मत तिथ दुर्दैवाने तयार झाल. प्रेम म्हणजे राजकारण असाही एक सूर दिसत होता.व्यासपीठावर मला मत मांडायची परवानगी नसल्यामुळे मी बोलू शकलो नाही.
खर सांगायचं तर प्रेमासारखी पवित्र भावना कोणती असूच शकत नाही. गर्व, अहंकार अशा गोष्टी ज्या ठिकाणी येतात ते प्रेम असूच शकत नाही. त्यामुळे काही दिवस एखाद्या व्यक्तीसोबत जवळीकतेने वागणं आणि त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करणं या दोन पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. स्वार्थासाठी एखाद्या व्यक्तीशी सलगीने वागणं हे स्वार्थासाठी अस शकत परंतु ते प्रेम नव्हे.
त्यामुळे ज्या ठिकाणी छुपा स्वार्थ, गर्व, काहीतरी मिळवण्याची इच्छा असते ते प्रेम नाही हे लक्षात घेणं खूप महत्वाच आहे. कोणीही दोन दिवसांच्या जवळीकतेला प्रेम म्हणून, त्या पवित्र भावनेला गलीच्छ बनवू नये. ‘पिया बिन नाही आवत चैन’ अस जेव्हा एखादा प्रेमवीर म्हणतो तेव्हा त्याच्या प्रेमाची खोली, आर्तता बाहेर राहून ठरवणं म्हणजे पाण्यात न उतरता पाण्याची खोली आणि गोडी ठरवण्यासाराख होईल.
‘प्रेमे आलिंगन जय देव देवा’ अस म्हणताना, प्रेम म्हणजे व्यापार अस म्हणणाऱ्यानी विचार करावा. ‘प्रेम’ या अतिपवित्र शब्दाला बदनाम करण हे आयुष्याच्या अगदी मुलभूत गोष्टीला, पायाला आव्हान देण्यासारख होईल.
बाबा आमटे याचं कुष्ठरोग्यांवरच प्रेम, शिवरायांच प्रजेवरच प्रेम, कृष्णाचं राधेवरच प्रेम हा काय व्यापार होता?
कामालावरचा दवबिंदू, सकाळचा सूर्य, कोजागिरीचा चंद्र, भल्या मोठ्या सुर्याला आपल्या जबड्यात सामावणारा अतिविशाल समुद्र हे सदैव दुसऱ्यांसाठी जगतात, ते काय व्यापार म्हणून?
“पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेम्बाकडे बघ,
बघ, माझी आठवण येते का?”
अशा आर्त प्रेमाला चुकीच्या पद्धतीने समजू नका तर खर प्रेम ‘अनुभवा’... एकदा करून बघा...!!!
No comments:
Post a Comment