आयुष्यात प्रत्येक व्यक्ती कधीतरी कोणावरतरी अगदी जीवापाड प्रेम करतच असतो. रक्ताच्या नात्यातील लोकांवर तर तो प्रेम करतोच पण अशा नात्याबाहेरील एखाद्यावर सुद्धा तो कधीतरी जीव ओवाळून टाकायला तयार असतो.
मी अनेकदा या गोष्टीचा विचार करतो की माणसात हे कोणत्याही नात्याबाहेरील प्रेम करण्याची ताकद येते कुठून? कारण खरखुर प्रेम करायला मुळातच प्रचंड सामर्थ्य आतूनच असावे लागते.
परंतु केवळ आजूबाजूला सगळीकडे दिसतात म्हणून प्रेम करणारे किती आणि सच्चे प्रेम करणारे किती हा मोठा प्रश्न आहे. बऱ्याचदा नात्याबाहेरील व्यक्तीवर प्रेम करताना माणूस विचार करतो. तो त्यामाधेसुद्धा स्वत:चं स्वार्थ शोधतो.
मी ज्या व्याकीवर प्रेम करतोय तो कसा आहे, मग यात त्याच सौंदर्य, स्वभाव, पैसा यापैकी किंवा अजून काहीतरी गोष्टीचा विचार मनुष्य करतो. म्हणजेच काहीतरी विचार करूनच तो प्रेमात 'पडतो'.
परंतु हे प्रेमात 'पडणं' असू शकत नाही....भलेही ते प्रेमात 'उतरणं ' असेल!!. कारण कोणीही विचार करून कधीच कशातही 'पडू' शकत नाही. केवळ मनाने केल जातं, उत्स्फूर्तपणे येतं तेच खरं प्रेम !!!
माणूस जेव्हा पाण्यात 'उतरतो', तेव्हा तो स्वत:ला सांभाळूनच भिजतो. परंतु पाण्यात एकदा 'पडल्यानानातर' त्या पाण्याचा अगदी मनसोक्त आस्वाद घेता येतो...मग ते पाणी अगदी नाका-तोंडात गेले तरी!
आईवर प्रेम करताना आपण कधी विचार करता? कारण ते असतं खर-खूर, निर्व्याज प्रेम असतं.
म्हणून प्रेमात केवळ उतरू नका तर प्रेमात "पडा"...!!
This comment has been removed by the author.
ReplyDeleteHey lai bhari... I agree with u :)....good one...keep it up...:)
ReplyDeleteअरे अजिंक्य, धन्यवाद...
ReplyDelete