प्रत्येकाने आयुष्यात अगदी साधे-सरळ असावे, सर्व व्यवहार पारदर्शक असावेत असं आपण अगदी नेहमीच म्हणतो आणि ऐकतोसुद्धा. आणि या मताबद्दल कोणाचे दुमत असण्याचेदेखील कारण नाही. आपण करत असलेल्या सगळ्या गोष्टी, संपूर्ण व्यवहार जर पारदर्शक असलेत तर कधीही खोटं बोलावे लागून गोचीत येण्याची शक्यता राहत नाही.
परंतु तरीदेखील काहीतरी लपवून ठेवण्यातसुद्धा एक वेगळाच आनंद असतो. लपविण्याची नशा काहीतरी आगळीच..उदाहरणच द्यायचं तर, तरुण वयातील मुलगा अगदी लपूनछपून पण तितकच खरखुरं प्रेम त्याच्या प्रेयसीवर करतो. मात्र 'तिच्याशी' बोलताना, त्याचं ते घरच्यांपासून लपवून ठेवणं, तिला गुपचूप भेटणं, एकमेकांना भेटवस्तू देणं आणि घरी ते मित्राने दिले, म्हणून सांगणं या सगळ्यात एक वेगळीच मजा आहे.
अशा वेळी सगळ्या गोष्टी नैतिक आणि अनैतिकतेच्या चौकटीत बसवणे किंवा कायद्याच्या तराजूत ते मोजणं हे योग्य होणार नाही. अर्थात अशी कोणती गोष्ट लपविताना, त्याबद्दल लापविणाऱ्याच्या मनात कोणतीही खोट अथवा अप्रामाणिकपणा नको.
आपला प्रत्येक व्यवहार चुकीचा की खराखुरा,मन:पूर्वक हे ज्याचा-त्याचा विवेक त्याला सांगत असतो.
हा लपवा-छुपवीमधला आनंद, ही लपविण्यातील नशा आयुष्यात एकदा तरी अनुभवाच! कारण डोंगराआड लपलेला सूर्य हा माथ्यावर आलेल्या पूर्णाकृती सूर्यापेक्षा कधीही मोहक असतो, आकर्षक असतो...!!

No comments:
Post a Comment