Thursday, October 6, 2011

फोटोतलं आयुष्य

कोणतीही चांगली गोष्ट स्मरणात ठेवणं ही व्यक्तीची गरज आहे. वेगवेगळया प्रकारे मनुष्य या गोष्टी जतन करून ठेवायचा प्रयत्न  करतो.

एखादी नवीन वस्तू विकत घेतल्यानंतर तिची काहीतरी आठवण ठेवणं, एखाद्या ठिकाणी फिरण्यासाठी गेल्यानंतर फोटोमध्ये ती आठवण साठवून ठेवणे या सगळ्या माणसाच्या गरजा आहेत. कारण हे आनंदाचे क्षण आयुष्यात नंतर पुन्हा आठवणे हीसुद्धा एक गरज आहे. यातून मरगळलेल्या आयुष्याला नवचेतना मिळते आणि पुन्हा नवीन उत्साहात जगायला प्रेरणा मिळते.

परंतु नुकताच आलेला अनुभव सांगतो. एका सौंदर्यस्थळी भटकंती करण्यासाठी म्हणून आम्ही काही सहकारी मित्र गेलो होतो. अशा ठिकाणी गेल्यावर तिथलं सौंदर्य डोळ्यात साठवणं हे खूप आनंददायी असतं. परंतु आमचा एक सहकारी अत्यंत फोटोवेडा! स्थळाचं सौंदर्य अनुभवण्यापेक्षा फोटो काढण्यात तो इतका मश्गुल होतं की त्या जागेचं सौंदर्य टिपून घेण्यापेक्षा त्याला स्वत:चा सुंदर फोटो येणं अधिक महत्वाच वाटत होतं.

ही मानसिकताच न समजू शकणारी आहे. एक आठवण म्हणून फोटो काढणं वेगळ आणि फोटोसाठी अशा ठिकाणी जाणं हे अगदीच वेगळ. कोणत्याही व्यक्तीसोबत फोटो काढणं, अशा ठिकाणी जाऊन फोटो काढणं हे, मला व्यक्तीच्या आंतरिक अहं चं द्योतक वाटतं.

निसर्गापेक्षा स्वरूपावर प्रेम करणं हे खरंच घटक आहे. माणसाच्या स्वार्थाचं आणि गर्वाचं ते प्रतिक मी मानतो.

No comments:

Post a Comment