आपल्यातला प्रत्येक जण कितीतरी वेगवेगळया प्रसंगाना रोजच सामोरे जात असतो. त्या सगळ्यातून तो आपल्या जगण्याची एक परिसीमा, एक चाकोरी बनवून घेतो. मग या सगळ्यातून निवांतपणा म्हणून 'weekends' ला नेहमीच्या ठरलेल्या ठिकाणी फिरायला जाणं हेसुद्धा नंतर एक चाकोरीबद्ध होऊन जातं. मग या सगळ्याचा कंटाळा यायला लागतो.मग काही दिवसांनी 'कंटाळा येतो' या गोष्टीचाच कंटाळा यायला लागतो. हे सगळं चक्र मोठं विचित्र असतं.
मग अशा सगळ्यात आनंद कुठे, दिलखुलास आयुष्य कुठे, बेभान होऊन स्वत:ला विसरणं कुठे आणि चैतन्याने मनमुराद हसणं कुठे? हे सगळं आपण हरवून बसलो आहोत का?
सुदैवाने याचं उत्तर 'नाही' असं आहे. आयुष्यात रंग भरायची आपली इच्छा असेल तर कितीतरी मोहक रंग आपली वाट पहाताय. फक्त त्यांना जरा धूळ झटकून, निरखून बघण्याची गरज आहे. रोज केल्या जाणाऱ्या एखाद्या गोष्टीचा मन:पूर्वक आस्वाद घेऊन बघा एकदातरी.
नेहमीच रटाळ मनाने केल्या जाणाऱ्या गोष्टींकडे जरा वेगळ्या नजरेने बघा. काहीही करत असताना ते करत असल्याचा आस्वाद घ्या..मन:पूर्वक करून तर बघा. त्यात आपल्याला नवीन काहीतरी नक्की सापडेल.
'झेन' नावाच्या संस्कृतीमध्ये झेन लोक अगदी छोटी कामेसुद्धा रंगून जाऊन करतात, त्यांच्यासाठी ती कामेसुद्धा तपश्चर्येचा भाग होऊन जातात. ते लोक चहा पिण्यासारखी कामे करायला एका तासापेक्षा अधिक काल घेतात. कारण ते या सगळ्यात 'मजा' घेत असतात.
आयुष्यात आनंदी होण्यासाठी नेहमीच 'routine work' बाजूला ठेऊन बाहेर जाण्याची गरज नसते. आंतरिक आनंद हाच खऱ्या अर्थाने चीरानंद आणि चिदानंद असतो.

No comments:
Post a Comment