लेखाचे
शीर्षक
वाचून
आपल्यातील
बरेच
लोक
हा
लेख
वाचतांना
आजूबाजूला
कोणी
नाही
ना,
याची
खात्री
करून
मगच
एकट्यात
लेख
वाचतील.
विशेषत:
भारतीय
समाज
मानसिकतेत
हे
अगदीच
स्वाभाविक
आहे.
अन्न,
पाणी,
वस्त्र,
निवारा
आणि
sex या
माणसाच्या
अगदी
मुलभूत
आणि
नैसर्गिक
गरजा
मानल्या
जातात.
यापैकी
अन्न,
पाणी,
वस्त्र,
निवारा
हे
कसे
मिळवायचे,
वापरायचे
आणि
त्यासंबंधी
इतर
साऱ्या
गोष्टी
आमचा
समाज,
आमचे
वडीलधारे
आम्हला
शिकवतात.
मात्र
sex बद्दल
असं
मार्गदर्शन
तर
सोडाच,
मात्र
एक
साधा
चकार
शब्द
तरी
किती
घरांमध्ये
काढला
जातो?
संपूर्णपणे
जी
गोष्ट
नवीन
आहे,
ज्यामुळे
शरीरात
काही
बदल
होता
आहेत,
त्या
गोष्टीचे
आकर्षण
निर्माण
होते
आहे
आणि
अशाच
वेळी
त्या
गोष्टी
बद्दल
जर
कोणी
काही
बोलायलाच
तयार
नसेल,
हे
आकर्षण
कशामुळे
आहे,
ते
कसे
हाताळायचे,
हे
नवीन
बदल
काय
आहेत
हे
सांगायला
कोणी
नसेल,
याउलट
त्या
गोष्टीबद्दल
गुप्तता,
न्यूनगंड
निर्माण
करणारे
वातावरण
जर
आजूबाजूला
असेल
तर
त्या
मुलाने
किंवा
मुलीने
ती
गोष्ट
कशी
सांभाळावी?
आणि
मग
याच
मुलामुलींच्या
हातून
sex च्या
संबंधाने
काही
चूक
घडली
तर
मग
यात
सगळा
दोष
या
मुलामुलींवर
टाकणं
कितपत
योग्य
ठरेल??
समाज,
वडीलधारे
यांची
यांत
काहीच
चूक
नाही
का??
मुळामध्येच
sex अर्थात
संभोग,
प्रणय
हे
प्रत्येक
सजीवाला
निसर्गाने
दिलेले
आत्यंतिक
शुध्द,
पवित्र
आणि
मुलभूत
वरदान
आहे
असे
म्हंटल्यास
वावगे
ठरू
नये.
अर्वाचीन
काळात
संभोगाद्वारे
मनुष्याला
उच्च
कोटीचा
निर्मळ
आनंद
(sheer pleasure) मिळतो हे कळले.
तेव्हा
हा
आनंद
पुन्हा
पुन्हा
मिळावा
यासाठी
माणसाने
वारंवार
sex करून
पहिले.
मात्र
एका
विशिष्ट
मर्यादेनंतर
हा
आनंद
मिळेनासा
झाला.
मग
हा
आनंद
मिळविण्यासाठी
माणसाने
अनेक
मार्ग
योजून
पाहिलेत
आणि
याच
यत्नातून
त्याला
समाधीचा
शोध
लागला.
म्हणजेच
sex ही
काही
अंधारात
करायची
किंवा
उरकून
घ्यायची
गोष्ट
नाही
हे
समजून
घ्यायला
हवे.
sex हीसुद्धा
शिकविण्याची
आणि
शिकण्याची
कला
आहे.
आणि
म्हणूनच
आपल्याकडे
वात्सायनासारखे
संत
लोक
याबद्दल
सांगून
गेलेत.
याचा
अर्थ
असा
होतो
की
मनुष्यामधील
ही
sex ची
उर्जा
योग्य
मार्गाने
सांभाळून,
त्याला
योग्य
दिशा
देऊन
कालांतराने
ही
उर्जा
विधायकतेकडे,
आत्मिक
आनंदाकडे
परावर्तीत
(transform) करायची असते.
पण
ज्याप्रमाणे
आपणास
डोंगराच्या
पलीकडे
जायचे
असेल
तर
आधी
तो
डोंगर
नाकारून
चालत
नाही
तर
तो
पार
करावाच
लागतो
आणि
मगच
इप्सित
स्थळी
पोहचता
येते.
मला
वाटते
की
आयुष्यात
sex नाकारून
पुढे
न
जाता,
ते
शुध्द,
नैसर्गिक
आणि
त्याच्या
खऱ्याखुऱ्या
रुपात
स्वीकारत
पुढे
जावे.
No comments:
Post a Comment