समुद्र आणि वादळ यांच तसं अगदी जुनं नात नाही का?
समुद्र असला की वादळ येतंच आणि स्थितप्रज्ञ समुद्राला हलवून सोडतं...
एवढा मोठठाला समुद्र तो, पण निघतोच की तोसुद्धा ढवळून
अर्थात वादळ किती मोठं ते काही कधी दिसत नाही म्हणा..
ढवळून निघतो सगळा समुद्र त्या वादळाने
हेलकावे खातो अक्षरश: ... अगदी अंतर्बाह्य
काय म्हणत असेल बर मन समुद्राचं त्यावेळी?
काहीही म्हंटलं तरी वादळाने त्याला हलवून सोडलं एवढ मात्र नक्कीच..
वेदनांचं काहूर माजत असेल हृदयात नुसतं
पश्चातापाने त्रास होत असेल आतमध्ये...
त्रास होत असेल आपल्या मोठ्या,विशाल असण्याचा त्या सागराला
मोठ्ठा आहेस तर डगमगतो कशाला त्या वादळाला असा प्रश्न विचारून भंडावत असतील प्राणी त्या सागरातले..
छोटासा असता, क्षुद्र असता तर कोणी नसतं विचारलं त्याला..
कारण त्याचं छोट्या असण्याकडून तशीच अपेक्षा असते ना सगळ्यांना...
खरच छोटं असणं इतकं सुखदायक असतं का?
अशा वाऱ्याला घाबरून, त्याच्या हलवण्याला घाबरून, त्याच्या गोंगाटाला घाबरून, प्रश्नांनी पिडणाऱ्या प्राण्यांना भिऊन जाऊन, अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून जाऊन छोटंच राहणं सुखदायक, आनंदी असेल का हो?

No comments:
Post a Comment