प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी नातं हे येतंच असतं. मनुष्य 'सामाजिक' प्राणी आहे, त्यामुळे तो कुठल्यातरी नात्याविना राहूच शकत नाही. भलेही कुठलं जवळचं नातं त्याला नसेल परंतु मित्राचं, दूरच्या भावा-बहिणीचं, एव्हढंच कशाला पण अहो शत्रूचंसुद्धा नातं असतंच की! मनुष्यजन्मच मुळी नात्यात गुंफला गेला आहे.
अशाचं एका नात्याची ही कहाणी नुकतीच बघितली. काही दिवसांपूर्वी माझा एक सहकारी मित्र जरा उदास वाटला. त्याबद्दल जरा खोदून विचारल्यावर त्याने त्याची कहाणी सांगितली. अगदी रोज तो त्याच्या प्रेयसीला न चुकता भेटत असे. भेटून परतल्यावरसुद्धा ते कितीतरी वेळ फोनवर सतत बोलत असतं. दिवसाचा प्रत्येक क्षण एकमेकांसोबत घालवण्याचा ते प्रयत्न करत. परंतु लवकरच त्यांच्यात छोट्या-छोट्या गोष्टींवरून खटके उडायला लागलेत. आणि ते एकमेकांपासून अलग झालेत.
अशा उत्कट प्रेमाविषयी मला खरच आदर आहे. अशा प्रेमाला खरच सलाम! पण कायम सोबत राहण्यानेच प्रेम वाढतं असा गैरसमज मात्र अत्यंत चुकीचा. कुठलीही गोष्ट फुलायची असेल, खुलायची असेल, उमलायची असेल, बहरायची असेल तर वेळ हा लागणारच ना! कशालाही वाढीसाठी उसंत ही लागतेच.
झाडांनासुद्धा वाढीसाठी काही काळ पाणी देणं थांबवतात. याला 'ताण देणं' असं म्हणतात. यामुळे पुढल्या वेळी जेव्हा झाडांना पाणी देण्यात येतं, तेव्हा ती झाडं अधिक क्षमतेने पाणी शोषून घेतात. शिवाय फक्त उन असून चालत नाही. कधीतरी गारवा देणारी सावलीसुद्धा तेव्हढीच महत्वाची असते.
अगदी असंच असतं नात्यांचंसुद्धा.जरा बहरू देत त्या नात्याला, खुले देत, अधिक प्रगल्भ अर्थ मिळू देत त्यातून. नातं हे असंच बहरतं. एकदा फक्त जरा उसंत देऊन तर बघा...जरा अधिक शांतपणे नातं अनुभवून तर बघा.

No comments:
Post a Comment