Friday, October 18, 2013

थेंबातलं आभाळ...

आभाळ...विशाल, अमर्याद, अनंत आभाळ..
जेव्हढी विशाल, धरणी तेव्हढेच विशाल आभाळ..

आकाशाला गवसणी नाही घालता येत म्हणे,
पण सगळ्यांचं आभाळ वेगवेगळं असत...कोणाचं अतिविशाल तर कोणाचं छोटंसं.


एक गोष्ट मात्र नक्की, आपलंआपलं आभाळ ज्याला-त्याला सांभाळता आलचं पाहिजे
डोक्यावरलं छप्पर सुव्यवस्थित असलं की घर कसं सुरक्षित असतं...

प्रत्येक जण आपल्या आपल्या खिडकीतून बघत असतो या आकाशाकडे
एव्हढं मोठ्ठ आभाळ..पण सामावातच की खिडकीमध्ये.

हे सामावनं प्रत्येकाच्या नजरेवर अवलंबून असतं...
कारण खिडकीतून आकाश बघण्यासाठी, थेंबातसुद्धा आभाळ बघण्याची ताकद असावी लागते....

No comments:

Post a Comment