सगळ्यांचा अगदी लाडका सण म्हणजे 'दिवाळी'. प्रकाशाचा अंधारावर विजय, सत्याचा असत्यावर विजय, ज्ञानाचा अज्ञानावर विजय अशा अनेक प्रकारांनी दिवाळीचं वर्णन केलं जातं. खरोखरच, आनंदाचा, उत्साहाचा असाच हा सण.
आसमंत प्रकाशाने नुसता उजळून निघालेला असतो. सगळीकडे लखलखाट असतो. घराघरातील आकाशकंदील, पणत्या यांनी वातावरण कसं उजळून निघालेलं असतं. फराळाच्या घमघमीत वास सगळीकडे दरवळत असतो. अशी ही दिवाळी उल्हासित करते आणि सगळीकडे प्रसन्नता व्यापून टाकते.
परंतु हा वातावरणातला प्रकाश आपल्या मनापर्यंत पोहचतो का? ही प्रसन्नता खरोखरीच मनातसुद्धा व्यापून उरते का? की बंद करून टाकतो आपण मनाची दारं या प्रकाशासाठी? या प्रकाशामध्ये मनाचे सगळे कोपरे दिसतील अशी भीती तर नसते ना आपल्याला वाटत?
आपल्या संस्कृतीत कितीतरी सण,उत्सव साजरे करायची परंपरा आहे. या प्रत्येक उत्सवामागे व्यक्तीच्या उन्नतीची, त्याच्या स्वयंशोधाला प्रेरणा देण्याची मुख्य संकल्पना असते. परंतु आपण कितीतरी वर्ष दिवाळी सण अनुभवला, साजरा केला. मात्र या इतक्या वर्षात आपल्यात किती आणि काय विधायक बदल झाला हे आपणच परीक्षण करायला हवं.
एकदा अगदी त्रयस्थ म्हणून आपल्या मनाच्या प्रत्येक कोपर्यात विवेकाचा दीप लावून बघाचं! बघा काय काय दिसतं या प्रकाशात. कदाचित खरेपणा दिसेल तुम्हाला तिथे. तर खोटेपणाचा कळस सुद्धा पडेल नजरेस. आजवर केलेलं सगळं काही दिसेल या प्रकाशात.. स्वार्थ, परमार्थ, कोणाला केलेली मदत.. सगळं सगळं दिसेल या प्रकाशात..पण हा दीप फक्त निदर्शनास आणून देण्याचं काम करतो. त्यावर काय करायचं हे ज्याने त्याने स्वत:च ठरवायचं.
एकदा असा स्वत:चा त्रयस्थ म्हणून विचार करून बघाच.. आणि मनातली दिवाळी साजरी करून बघा...

No comments:
Post a Comment