प्रत्येकाचे कितीतरी पैलू हे आयुष्यभर अगदी लपून असतात. वरून अत्यंत आनंदी, खेळकर वाटणारा व्यक्ती प्रत्यक्षात खूप अशांत, अस्थिर असू शकतो. मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी ही अस्वस्थता आपण दाबून टाकतो, ती उफाळून वर येऊच नये असा प्रयत्न सतत करत असतो.
कामाच्या गाड्यात ही अस्वस्थता लपून, दबून राहते खरी मात्र सगळ संपलं की पुन्हा नैराश्य, अस्वस्थता मन व्यापून टाकते. पुन्हा मनाच्या समुद्रात वादळ निर्माण होतं. पुन्हा अस्वस्थता जगणं असह्य करून टाकायला लागते, आपण अगदी असह्य होऊन जातो. आणि हे सगळं झाकून टाकायला पुन्हा कामाचे, आणि वेगवेगळे बहाणे शोधून काढायाला लागतो. पण हे शांत ज्वालामुखीसारखं असतं. कधी उफाळून येऊन सगळं उध्वस्त करेल याचा नेम नसतो.
या सगळ्याचं मूळ म्हणजे सतत काहीतरी बनायची ओढ. ही ओढ काही फक्त धनाढ्य, सत्ताधीश होण्याची नसते. तर सुखी, आनंदी याचीसुद्धा असते. नैराश्य वगैरे टाळण्यासाठी कितीतरी प्रयत्न केले जातात. परंतु हे सगळं असं सहज सोडून देणं, टाळणं शक्य नसतं. त्यामुळे पुन्हा चीडचीड होते.
परंतु काहीतरी टाळून, काहीतरी न स्वीकारता हवे ते मिळवण्याचा प्रयत्न कधीच यशस्वी होऊ शकत नाही. कारण इप्सित स्थळी पोचायचं असेल तर खडकाळ असलं तरी रस्ता पार केल्याविना पर्याय नसतो. रस्त्यावरच्या सगळ्या गोष्टीना सामोरं हे जावचं लागतं.
आयुष्याचाही अगदी तसंच. येईल ते अनुभवणं महत्वाचं. प्रत्येक टप्पा अनुभवा. दु:ख अनुभवल्याशिवाय सुखाची अपेक्षा करणेसुद्धा चूक. येईल तो अनुभव घ्या. फक्त त्रयस्थ म्हणून हे सगळं बघत राहा. सगळ अनुभवत राहा. याला नक्कीच काही कालावधी लागेल. मात्र आपोआप जगणं अर्थपूर्ण होईल हे मात्र नक्की !

No comments:
Post a Comment