Saturday, December 3, 2011

स्वकेंद्रित आयुष्य.

कोणाही व्यक्तीला आजूबाजूचे लोक आपल्याविषयी बोलतात, आपल्याला विचारात घेतात ही गोष्ट खुपच सुखद असते आणि समाजशील असलेल्या मनुष्य प्राण्यासाठी ही गोष्ट अगदीच स्वाभाविक आहे. यामुळे आपल्या जवळचे लोक आपल्याशी भावनिक दृष्ट्यासुद्धा बांधले गेले आहेत, हे दिसून येते.

परंतु सदोदित सगळ्यांनी आपल्याच विषयी बोलावे, ही अतीटोकाची स्वकेंदितता मात्र घटक असते. यांतून त्या व्यक्तीचे संकुचितपण दिसून येते. शिवाय सातत्याने आपलं विचार इतरांनी करावा, यांतून त्या व्यक्तीच्या आतली असुरक्षितता सुद्धा दिसून येते.

मुळात जेव्हा आपण समाजात वावरत असतो तेव्हा काही प्रसंगी तरी समाजाचा गाडा सुरळीत चालण्यासाठी समाजाच्या काही नियमांशी जुळवून घेणं महत्वाचं ठरतं. अनेक व्यक्तींची सामाजिक वर्तुळ जेव्हा जवळ येतात, तेव्हा प्रत्येकाला काहीतरी त्याग,थोडेफार पुढे-मागे करावेच लागते. केवळ स्वकेंद्रीत असून अशा वेळी चालत नाही.

कधीतरी इतरांच्या बाबीतही रस घेणं आवश्यक असतं.कारण आपल्याला जशा भावना असतात, दु:खं, आनंदाचे क्षण असतात, तसेच ते इतरांनाही असतात.त्यांनाही ते सगळ्यांशी वाटायचे असतात. सदैव आपणचं सगळ्या संभाषणाचा, विचारांचा केंद्रबिंदू असावं ही अपेक्षा करणं अतिशय चुकीचं ठरेल. तेव्हा एकदा स्वत:चं सामाजिक मूल्यमापन करून बघाचं...आणि गरज असल्यास आणि पटल्यास आवश्यक ते बदल सुद्धा करा स्वत:मध्ये.

No comments:

Post a Comment