संगीत म्हणजे आत्म्याचा शोध, आपल्यातल्या अमूर्ताचा शोध असं अनेकदा ऐकलं आणि वाचलं होतं. परंतु त्याचा प्रत्यक्ष म्हणावा तसा मनस्वी अनुभव आजवर आला नव्हता.
मात्र नुकताच तसा दैवी अनुभव आला. नेहमीप्रमाणे सकाळी ध्यानधारणा करून मी सकाळी शास्त्रीय संगीत ऐकत बसलो होतो. शास्त्रीय संगीत ऐकणं हा सदैव आनंददायी अनुभव असतो. मात्र हा योग काहीतरी विलक्षण होता. चंद्रकंस कानात घुमत होता. त्यातल्या स्वरांनी वातावरण अगदीच हलकं झाल्यासारखं जाणवत होतं. चैतन्याचे अखंड झरे वाहायला लागले होते. राग हळूहळू फुलत होता, खुलत होता. स्वर पुढे जात होते.
मात्र तरीसुद्धा अजूनदेखील वातावरणात ते सूर तरंगत असल्यासारखे जाणवत होते. हे सारे स्वर एकत्र येवून काहीतरी अमूर्त घडवत होते. खरं म्हणजे अमूर्त घडवावं लागत नाही, ते आपोआपच घडत होतं. समोर काहीतरी विलक्षण, प्रचंड चैतन्यदायी निर्माण होतंय याची जाणीव सातत्याने झाली. अशी जाणीव होण्याच्यासुद्धा पलीकडे जायची तीव्र इच्छा मनात होती. आणि काही क्षण असे आलेत की त्यात जे झालं ते शब्दांच्या पलीकडे होतं. स्वत:च्याच खूप खूप आत तेव्हा मी होतो. तेव्हा नेमकं काय झालं ते सांगता येन कठीण आहे आणि ते सांगण्याची इच्छा सुद्धा नाही. ते तसंच शब्दातीत असू देत.
संगीत मनावर सातत्याने चैतन्याचे घाव घालून त्याच्यावरचं मळभ दूर करतं, जेणेकरून आतमध्ये पोहचणं अधिक सुलभ आणि सुखकर होवून जातं.
संगीतातला मी काही फार मोठा जाणकार नाही. संगीत ऐकतांना जे काही अनुभव येतात त्यांचे अर्थ नेमके काय हेसुद्धा खरंतर नाही सांगता येत. परंतु जे काही अनुभव येतात ते आत्यंतिक आनंददायी असतात हे मात्र खात्रीशीर!!

No comments:
Post a Comment