Saturday, April 14, 2012

तू आहेच अशी वेगळी...


तू आहेच अशी वेगळी, येतेस आणि सारं काही बदलवून टाकतेस
तुझ्यातलं सगळ्यात जास्त जर काही आवडत असेल ना तर तो तुझा खरेपणा
खूप कमी लोकांकडे असतो तो....जपून ठेव तो ठेवा
अगदी मी अपेक्षापुर्तीसाठी सोड म्हंटल तरी जपून ठेव...

तुझ्या नुसत्या असण्याने मी पारदर्शक होतो
दिसायला लागते आतली सगळी घाण, कचरा आणि दंभ...खोटेपणाचा
त्यामुळे कधीकधी खूप त्रास होतो तुझ्या असण्याचा
मात्र तू नसलीस ना, तर ही घाण साडवून टाकेल गं मला आतून

तू म्हणशील किती स्वार्थी, सडण्याच्या भीतीने मला जवळ राहा म्हणतोस,
किंवा तुझ्या मनात हासुद्धा विचार नाही येणार..हासुद्धा माझ्याच घाणीतील किडा
माझीच लाज वाटायला लागते गं तू सोबत असतेस तेव्हा
इतकी खरी, इतकी साधी, निखळ कशी गं तू

कधीकधी म्हणेल मी तुला नको राहूस इतकी खरी, पण लक्ष नको देऊस
मनस्वी आनंद होतो, मी तुझा अन् तू माझी असण्याचा
प्रेम म्हणजे शरण जाणं फक्त बोलत राहिलो, पण अनुभूती तूच दिलीस
किती सहजपणे सगळं काही करून जातेस तू

तुझी अनुभूती आता घेतोय...तुझं असणं आता अनुभवतोय...
कदाचित तुझ्या असण्याचं महत्त्व मला समाजावं म्हणून तर तू दूर नसशील ना?
काहीही असो...तू आहेच अशी वेगळी...तुझ्या नुसत्या असण्याने मी पारदर्शक होतो...

No comments:

Post a Comment