मनुष्य आणि इतर निर्जीव यांच्यामधील महत्वाचा फरक म्हणजे
मनुष्यामध्ये असणारी स्वयंचेतना. याच चेतनेमुळे मनुष्य स्वत:च्या हालचाली आणि इतर
सर्व क्रिया करू शकतो. आणि मनुष्याची ही स्वयंचेतना किंवा त्यांचे असणारे अस्तित्व
म्हणजेच आयुष्य असं म्हणता येईल.
आता या
जगण्यासाठी माणसाला किती आणि कोणत्या प्रकारच्या गोष्टींची आवश्यकता असते यावरून
त्या दृष्टीने वाटचालीस सुरुवात होते. आणि अशा गरजेपोटीच माणसाचे जगण्याचे नवे शोध
सुरु होतात. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा एवढ्याच
मनुष्याच्या गरजा होत्या. अग्नीच्या शोधाने अन्नाची गरज भागली. चाकाचा शोध
हासुद्धा महत्वाचा ठरला. वस्त्र म्हणून वल्कलं आणि निवारा म्हणून गुहा अशा प्रकारे
या मुलभूत गरजा माणसाने भागवल्या.
आता
स्वत:च्या व्यक्तित्वाची ओळख माणसाला हळूहळू व्हायला लागली. त्यामुळे इतरांवर
स्वत:चा प्रभाव निर्माण करण्यासाठी माणसाने अनेक शोध लावलेत. यातूनच अनेक युध्द,
संघर्ष जन्माला आलेत. अर्थातच dominance च्या गरजेपोटी हे शोध लागलेत.
भारताचं
उदाहरण घ्यायचं तर रामाचं घ्यावं लागेल. रामाचे एकपत्नीव्रत हे आपल्या दृष्टीने
वंदनीय आहे. परंतु त्याचवेळी अनेक गोपिकांसोबत क्रीडा करणारा कृष्ण हासुद्धा आपला
आदरस्थान आहे. म्हणजेच हा आदर्शांमध्ये झालेला बदल हासुद्धा जगण्याच्या नव्या
शोधांचं प्रतिक आहे.त्यानंतर आलेले शिवाजी महाराज हे एक शूर लढवय्येसुद्धा आपले
पूजनीय बनलेत. अशाच प्रकारे पुढच्या काळामध्ये टिळक, गोखले, फुले, शाहू असे अनेक
लोकनेते जन्मलेत. मला वाटतं की जेव्हा जेव्हा अशी नवीन विचारधारा जन्माला येते
तेव्हा ती गरजेपोटी येते. माणसाच्या जगण्याच्या शोधातून येते.
जगभरात
भांडवलशाही आणि मार्क्सवाद अस्तित्वात आला. सध्याच्या काळात मात्र individualism
अर्थात व्यक्तीवादाची चर्चा आहे. प्रत्येक व्यक्ती स्वत:चा मार्ग स्वत:च ठरवून
त्यानुसार वागते. अशा प्रकारे अनेक नवीन विचार येतात आणि त्यानुसार माणूस
स्वत:मध्ये आवश्यक ते बदल करत जातो. डार्विन च्या survival of the fittest या
सिद्धान्तानुसार मनुष्य हे सारे बदल करत असतो.
अशा
प्रकारे आयुष्याच्या सगळ्याच क्षेत्रांमध्ये बदल होत जातील.
अगदी अर्थकारणामध्ये,
विज्ञानामध्ये अनेकविध शोध लागत जातील. माणसाचं जीवन अधिकाधिक सुखकर होत जाईल.
परंतु सातत्याने जगण्याच्या नवनवीन शोधांची गरज का पडावी? यांतून माणसाच्या
स्वार्थीपणा आणि जगण्याची प्रचंड हाव प्रतिबिंबित होते. आयुष्याची आत्यंतिक आस
यातून दिसते. त्यामुळे प्रत्येकाने विचार करावा की केवळ मरण येत नाही म्हणून
जगण्याला काय अर्थ आहे? जगण्याची उर्मीच संपून गेली असताना जगण्याला काय अर्थ
आहे??
No comments:
Post a Comment