Tuesday, September 4, 2012

कामातलं समाधान


गेले काही दिवस मी कोणतेही लेखन केले नाही. फार काही busy वगैरे होतो असं नाही पण काहीतरी कारणामुळे ते झाले नाही.

सध्या engineering च्या शेवटच्या वर्षाला असल्यामुळे placement चा गोंधळ सुरु आहे. एका नामांकित कंपनीमध्ये मी नुकताच अनपेक्षितपणे place देखील झालो.
खरं सांगायचं तर आयुष्यात खरखुरं, अगदी genuine राहून सगळं काही मिळवता येतं. अर्थात फक्त ‘मिळवत’ राहणं हेच केवळ आयुष्याचं सार असूच शकत नाही. मात्र हे कळायला सुद्धा माणूस स्वत:शी प्रचंड प्रामाणिक असावा लागतो. आपण करतोय ते चुकीचं आहे हे कळत असूनसुद्धा अनेकदा व्यक्ती स्वत:चा स्वार्थ त्यागू शकत नाही.

सध्या placement च्या निमित्ताने अनेक लोक आवडीच काम नसलं तरी केवळ पैशापोटी ते काम करायला तयार होतात असं चित्र दिसलं. पैसा ही गरज नक्कीच आहे. मात्र तो साध्य होऊ शकत नाही. आणि अनेकदा हेच मन मान्य करायला तयार होत नाही. अशा वेळी स्वत:शी असणारा व्यक्तीचा प्रामाणिकपणा हाच केवळ मदतीस येऊ शकतो.

एका ठराविक मर्यादेपर्यंत पैसा आणि त्यापुढे मात्र समाधान, हेच मला वाटत की व्यावसायिक काम करतांना व्यक्तीचे निकष असावेत.

No comments:

Post a Comment