Wednesday, January 30, 2013

ग्रेस : महाकवी दु:खाचा !

ग्रेस गेल्याचे कळले आणि त्यांच्या आठवणी झरकन डोळ्यासमोरून गेल्यामाझे वयसाहित्यिक जाणमाझे सामान्यपण याचा विचार  करता फक्त ‘कविता’ या समान धाग्यामुळे ग्रेस मला तीन वेळा भेटले हे माझ्या आयुष्याचे संचित. 
२१ डिसेंबरला ग्रेस यांना पहिल्यांदा भेटलोत्यानंतरच्या आठ दिवसांत तीन वेळा त्यांना भेटलो२० डिसेंबरला भीतभीतच फोन करून त्यांची वेळ मागितली आणि ते भेटू शकतील का ते विचारले. ‘‘अहोमी माणूसच आहेमी लोकांना भेटतोया तुम्ही उद्या.’’

सकाळी १० वाजता दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल सन्माननीय कक्षात त्यांना भेटलोग्रेस सोडून बाकी सगळ्यांची दारं बंद होतीग्रेसनी आपल्या भूमिकेत थोडा बदल केला होता बहुतेक. He was free and he was available on that day. त्यांच्या पाया पडताच ‘‘ये क्या किया आपने सर.?’’ असं म्हणून ‘‘बोलामला भेटावंसं का वाटलं तुम्हाला अचानक?’’
‘‘
तुम्ही विक्षिप्त आहात असं ऐकलं होतं म्हणून यायला भीत होतोनाही तर खूप वर्षांपासून भेटायचं होत,’’ असं सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘३० र्वष मुलांना शिकवतोयसगळी नाही पण बरीच मुलं पास झालीमी विक्षिप्त असतो तर झालं असतं का हो हे?’’ तेवढय़ात सफाई करणाऱ्या मावशी आल्या. ‘‘मावशीमी तुम्हाला विक्षिप्त वाटतो का?’’ असं त्यांनी त्या मावशींना विचारलंमावशींनी नकारार्थी मान हलवली. ‘‘ऐसा है सर.’’ ते माझ्याकडे बघून बोलले .
नंतरच्या र्ध्या तासात त्यांच्या अलौकिक प्रतिभेच्या झळाही बसल्या आणि अत्यंत स्वाभाविकपणे झरझर वाहणाऱ्या शब्दांच्या झऱ्यात भिजलोतुमच्या कविता मला कळत नाहीतपण भावतात असं म्हणल्यावर ‘‘ग्रेस मलाही अजून कळायचा आहे,’’ असं ते म्हणाले आणि लगेच..
‘‘
हेलावते िहदोळते.. स्थिर होते पाणी
हीच माझी कहाणीग्रेस इतका सोपा आहेमी खोटं बोलत नाहीग्रेस खून करेलपण खोटं बोलणार नाही.’’
‘‘आणिक बोला सर.’’ माझ्याकडे बोलायला काही नव्हतंचमी उगाच तब्येत कशी आहे म्हणून विचारलं तेव्हा दु:खाच्या या महाकवीने त्यांच्या दु:खाचे जे वर्णन केले ते ऐकून मीच थोडा हेलावून गेलो.
‘‘
तब्येत उत्तम आहे. Cancer is my sponsor. ही आलिशान रूम आहेदिमतीला लोक आहेतहृदयनाथ मंगेशकर उपचाराचे पसेही घेत नाहीतअर्थात मी त्यांना काही पसे देऊ केले होते, but he did not take that. मी इथे आलो ते हृदयनाथनी आग्रह केला म्हणून.. पण मी त्यांना बजावून आलो I will come on my own conditions. बाकी ३० वर्षांत केसाला कधी कंगवा आणि वस्तरा लावला नाहीते केस फक्त गेलेबाकी माझा रोगसुद्धा माझ्यासारखाचत्याला मांडलिकत्व सोसत नाहीमागे घशात राज्य केलं होतंआता आतडय़ात नवीन राज्य केलंय.मला पाहिले ATM म्हणायचे ATM. ATM म्हणजे any time madira. दिवसाला १६ पाकिटं सिगरेट संपवायचो तेव्हा काही झालं नाही आणि सगळं सोडून दिल्यावर कॅन्सर झालालोक मागे कुजबुजतात ‘ग्रेसला कॅन्सर झाला.’ मी त्यांना ओरडून सांगतोमाझ्या रोगाबद्दल मी बोलीन. I will tell the people. बरेच लोक मला घरी बोलावतात तेव्हा मी त्यांना सांगतो I will be more happy in my own grave than your palace. असं आहे सर.’’मी काहीच बोललो नाहीत्यांनी माझी चौकशी केलीमी सगळी माहिती दिलीत्यांनी मध्येच विचारले ‘‘मला ते B.H.K. गणित कळत नाही.. पण या भागात फ्लॅटची किंमत किती असेल?” मी सांगितलं ४० लाख असेल कमीत कमीते माझी फिरकी घेत होते का ते माहीत नाही.. पण ते म्हणाले कुठून आणायचे एवढे पसेमी काही टय़ुशनवाला मास्तर नाही की रॉयल्टीवाला लेखक नाही.
ग्रेसच्या त्या तीन भेटींतल्या बऱ्याच गोष्टी आहेत. ‘‘मी श्रीग्रेस नाही किंवा Mr. ग्रेस नाहीमी क्त ग्रेस आहेअहोलोक माणिक गोडघाटे लिहून कंसात ग्रेस लिहितात आणि माझ्या एवढय़ा वर्षांच्या तपश्चय्रेवर पाणी फिरवतात,’’ अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. ‘‘एकाने मला विचारलं तुमचं नाव श्रीग्रेस लिहू की Mr. ग्रेस.. मी त्यांना म्हणालो कैग्रेस लिहा.’’ग्रेस काय बोलतात त्याचा अर्थ लावायला जायचं नसतंअर्थात ग्रेस तसं आव्हान कायम देत असतोपण त्यांचे शब्द हातात गच्च पकडलेल्या वाळूसारखे असतातजेवढे पकडायला जाऊ तितके ते निसटतातत्यांना साहित्य अकादमी मिळाला तेव्हासुद्धा
‘‘
तू मला कुशीला घ्यावे अंधार हळू ढवळावा
सन्यस्त सुखाच्या काठी वळवाचा पाउस यावा’’या ओळी त्यांनी या दिवसासाठी लिहिल्या होत्या असं वाटलंत्यांना दुसऱ्या भेटीत ते बोलूनदेखील दाखवलंते फक्त थोडे हसलेग्रेसला दुर्बोध म्हणणं हा खरं तर अजामीनपात्र गुन्हा म्हणून नोंद व्हायला हवातथाकथित समीक्षकांनी हा गुन्हा केलापण त्याची शिक्षा मात्र या सांध्यमग्न पुरुषास भोगावी लागलीपण "creativity is my life and conviction is my character" हेच निर्मितीमूल्य आणि जीवनसूत्र असलेल्या ग्रेसने आपली कवितेवरची निष्ठा कधी ढळू दिली नाही आणि आपल्या तत्त्वांशी प्रामाणिकपण सोडला नाहीग्रेसने कधी गाणी लिहिली नाहीतपण त्यांनी जे लिहिले त्याची गाणी झालीकारण त्यात उपजत गेयता होती. "I am an ancient" या त्यांच्या उक्तीची प्रचीती त्यांची प्रत्येक कविता वाचताना येते.
Everything has been figured out except how to live the life. 
या एका वाक्यात या तत्त्वज्ञाने आपल्याला सणसणीत चपराक लावलेली असते आणि
नको सुखाचा आरसा,नको दु:खाची चाहूल
वाढता वाढता झाडाने,कधी बनू नये फूल या ओळीतून जगण्याचावाढण्याचा परीघही घालून दिलेला असतो.
एकंदरीत साहित्याचाकवितेचा विचार करता ग्रेसला स्वीकारल्या किंवा नाकारल्याशिवाय पुढे जाता येणार नाही आणि ग्रेसला नाकारण्यासाठी सबळ कारण द्यावं लागेल.दु: हे कायम माणसाच्या पाचवीला पुजलेलं असतं आणि ग्रेसने या दु:खात जवळपास पाच दशकं निरपेक्षपणे साथ दिलीजिथे दु:खाला वेगळ्या परिप्रेक्ष्यातून पाहण्याचा प्रयत्न केला जाईल तिथे ग्रेस स्वाभाविकपणे भेटेलग्रेस म्हणूनच विस्मृतीत जाणार नाही.स्तोत्रात इंद्रिये अवघी..गुणगुणती दु: कुणाचे हे सरता संपत नाही..चांदणे तुझ्या स्मरणाचे
हे ग्रेसचे  फिटणारे ऋण आहेग्रेसने स्वतग्रेस आणि माणिक गोडघाटे यामध्ये द्वैत असल्याचे निक्षून सांगितले आहेमाणिक गोडघाटे गेले हे मान्य करायलाच हवे.. पण ग्रेस गेले नाहीत.. ग्रेस जाणार नाहीत.. जोपर्यंत संध्याकाळ होत राहील.. तोपर्यंत ग्रेस भेटत राहील.. तोपर्यंत ग्रेस हा आसमंत व्यापून राहील.. तोपर्यंत ग्रेस चिरंजीव राहील.
-    मकरंद दीक्षित          




No comments:

Post a Comment