Saturday, September 14, 2019

प्रिय सुरज सर

                                                                                                                                                                                              १४/०९/२०१९

प्रिय सुरज सर,

विषय - बोलावसं वाटतंय म्हणून 

सर, 
खरं तर तुम्हाला आम्ही सगळेच 'सर' म्हणून का बोलावतो हे बाहेरून बघणार्यांना कळणार नाही. कारण त्यांच्यासाठी आपण batch-mates ना. मला कितीतरी लोक विचारतात की batch-mate ला तुम्ही 'सर'  म्हणून का बोलावतात? याचं उत्तर माझ्याकडे कधीच नसतं आणि मी शोधायचा प्रयत्न सुद्धा नाही करत. तशा अर्थाने तुम्ही Delhi मध्ये UPSC चा अभ्यास करणाऱ्या सगळ्यांचेच सर आहात. मला तुम्ही कधी असं वर्गात बसून औपचारिक पद्धतीने नाही शिकवलंत, पण सर तुम्हीच म्हणायचात ना नेहमी, ' अरे अक्ष्या, चालता बोलता अभ्यास करत जा. मी आहे ना.' त्यामुळे तुम्ही अगदी मला भेटण्याच्या आधीपासून माझे नेहमीच सर होतात. 

सर तुम्ही अगदी पहिल्यांदा भेटला होतात ते आपल्या फरिदाबाद च्या training academy मध्ये , डिसेंबर २०१८ मध्ये . तेव्हा खूपच कमी बोललेलात माझ्याशी आठवतंय? मला वाटलं स्वाभाविक आहे, first time भेटतोय, होईल हळूहळू ओळख. पण मग दिसायला लागलं कि तुम्ही तर एकटेच बसताय classrooms मध्ये वगैरे , फार कोणाशी काही बोलायचेपण नाही तुम्ही. तेव्हा असही वाटून गेलं कि थोडे खडूस आहात कि काय. नंतर सर पुढच्या ट्रैनिंग साठी तुम्ही Banglore ला गेलात आणि आम्ही काही लोक फरिदाबादलाच थांबलो. सर तेव्हा तुम्हाला खरं तर फरिदाबादलाच continue करायची इच्छा होती - mostly तुमच्या treatment साठी. पण allotment नुसार तुम्ही Banglore ला गेलात आणि तिथले superstar झालात. फक्त trainee officers साठीच नाही तर faculty साठी सुद्धा. सर तुमच्यासारखा प्रचंड अभ्यासू, विचारांची खूप उंची गाठलेला पण या सगळ्याचं ओझं आजूबाजूच्यांना कधीच जाणवू न देणारा, तितकाच प्रेमळ असा माणूस कुठेही गेला तरी लाडका होणारच ना. आणि त्यात तुमचा भारदस्त आणि व्यक्तिमत्वाला झळाळी देणारा असा कणखर आवाज, म्हणजे cherry on the cake च म्हणा की ! 

असं सगळं चाललेलं असतांना तुमच्या मनात फरिदाबादला परत यायचा विचार चालूच होता आणि तुम्ही २५ जून २०१८ ला फरिदाबादला परत आलातसुद्धा. २६ जून ला सर तुमच्या स्वागतासाठी आम्ही सगळ्यांनी मेसमध्ये cake कापला होता. तुम्हाला तो cake फारसा आवडला नव्हता पण आजूबाजूच्या सगळ्या लोकांच्या प्रेमाने तुम्ही भारावून गेला होता आणि तुमच्या typical style मध्ये म्हणाला होतात ' मायला, अक्ष्या इतकं कशाला करता बे. ' 

आणि सर मग २६ जून पासून आपला हा प्रवास खऱ्या अर्थाने सुरु झाला. डिसेंबर मध्ये दूर दूर बसणारे तुम्ही आता मी, कौस्तुभ सर, पंकज, राहुल, परवीन सर, नितीश अशा सगळ्यांच्या गर्दीत बसायला लागलात. खरं सांगू का सर, यावेळी तुम्ही दूर जाऊन बसला असता ना तर आम्ही येऊन तुमच्या अवतीभवती बसलो असतो. काही दिवसातच तुम्हाला होस्टेल मध्ये रूम allot झाली आणि जेव्हा तुम्ही माझ्याच floor वर माझ्या जवळच्या रूम मध्येच येणार असं कळलं तेव्हा खरं  सांगतो काहीतरी वेगळाच आनंद झाला होता. तेव्हापासून रोज रात्री झोपण्याच्या आधी तुमच्या किंवा माझ्या रूम वर किमान एक तास गप्पा मारल्या नाही तर काहीतरी चुकल्या चुकल्या सारखं वाटायचं. रात्री खूप उशिरापर्यंत तुम्ही news ऐकत किंवा वाचत बसायचे आणि मग सकाळी lecture  साठी मला येऊन तुम्हाला उठवाव लागायचं. आम्ही सगळे उशीर झाला तर कशीतरी तयारी करून lecture साठी पळायचो, तुम्ही मात्र तुमच्या specially designed shirts , trousers (आमच्या दृष्टीने चित्रविचित्र रंगांच्या ) ज्या फक्त तुम्हीच आणि फक्त तुम्हीच इतक्या gracefully carry करू शकायचात ते अगदी व्यवस्थित 'परिधान' करूनच मग lecture ला यायचात. 

सर lecture मध्ये सुद्धा काही lectures ला तुम्ही आरामात आमच्या सोबत Ludo खेळायचात पण काही lectures  ला मात्र अचानक एकदम concentration ने ऐकायचात. कधीकधी तुम्ही, मी, राहुल,परवीन सर, सोनम, पंकज, रिंचेन इतका जास्त वेळ Ludo खेळायचो कि शेवटी कौस्तुभ सरांनी आपला एक Ludo Log नावाचा ग्रुप तयार केला होता. सर आपल्या रात्रीच्या गप्पा आणि parties आठवतात? mostly तुमच्याच रूमवर व्हायच्या. सर त्यावेळेला तुमची Green apple vodka आणि सोबत cranberry juice हि एक जगावेगळी आवड आम्हा देशी पामरांना समजली. अशा parties मधल्या गप्पा म्हणजे तर माझ्यासाठी academy मध्ये पुढच्या दिवसासाठीचा उर्जास्रोत होता. त्यात अगदी academy च्या gossips पासून ते Trump politics पर्यंत सगळ्या विषयांवर कसल्या बेभान गप्पा चालायच्या आपल्या. पण सर दरवेळी तुमच्याशी बोलताना, गप्पा मारतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवायची की तुम्ही काहीतरी वेगळ्याच मातीचे बनलेले आहात. एकीकडे academy च्या parties मध्ये तुम्ही तुफान डान्स सुद्धा करायचात आणि एखाद्या अत्यंत serious issue वर अगदी elite discussions चा part सुद्धा असायचात. असं सगळं जमायचं तुम्हाला. आणि हे सगळं किती सहजपणे, कोणताही अभिनिवेश न आणता , साधेपणाने करायचात तुम्ही. आणि हो, माणसांना (आणि अर्थातच मुलींनासुद्धा, chick magnet तर होताच तुम्ही) इतक्या सहजपणे आपलंस करणं कसं जमायचं तुम्हाला? 

सर, हे सगळं बोलत असताना तुमच्या तब्येतीविषयी बोलायलाच पाहिजे. रोज रात्री तुमचं blood pressure मोजायचो आपण तुमच्या portable machine मध्ये. नेहमीच machine red alert द्यायचं. खूप high energy असणाऱ्यांच ब्लड pressure पण नेहमी high असतं की काय कोणास ठाऊक! पण असल्या आजारांनी घाबरून जगणं सोडून देणाऱ्यातले तुम्ही नव्हतेच. जेवतांना कितीही सांगितलं तरी मिठाशिवाय जेवण जायचंच नाही तुम्हाला. तासनतास table-tennis खेळून BP कितीही shoot झाला तरी खेळण्याचा आनंद तुम्ही कधी सोडला नाही. सर, हे असं तुमचं तब्येतीकडे दुर्लक्ष करणं चूक असेलही कदाचित, पण कधीकधी हेवा वाटायचा हो तुमचा. असं तुमचं सगळं मुक्त हस्ताने उधळून देऊन, बेभानपणे जगताना पाहून खरंच हेवा वाटायचा आणि स्वतःची कीव सुद्धा यायची कधीकधी. 

Btw सुरज सर, आत्ताच तर बोलला होतात ना मला, 'अक्ष्या, furbisher ला full मजा करू मायला'. मग असे का सोडून गेलात अचानक. कळवायचं तरी होतं हो. सर, माहित नाही आता ludo खेळताना तेवढीच मजा येईल का आणि रात्री गप्पा मारताना तुमच्या चित्रविचित्र आवाज काढण्याच्या कलेवर मनमुराद हसणारे आम्ही, तुमच्याशिवाय तेवढ्याच आनंदाने गप्पा मारू शकू का. सर पण बाकी काहीही असो, यापुढच्या आयुष्यात नेहमीच एक पोकळी राहणार. आठवणींच्या कप्प्यात एक कप्पा नेहमीच खुणावत राहणार. 'ए अक्ष्या' अशी हाक ऐकायला कान नेहमीचं मुकणार. तुमचं सात मजली हसणं नेहमीच मनात घर करून राहणार. आणि डॉक्टर कडे गेल्यावर कधीही BP मोजताना तुमची आठवण येणार म्हणजे येणार . 

असो, आता जिथे कुठे असाल सर, तिथे काळजी घ्या स्वतःची. आणि नेहमीसारखंच मनमुराद जगा आणि आजूबाजूच्या सगळयांना तुमच्यातला  खूप सारा आनंद आणि प्रसन्नता वाटा. 

                                                                                                                                                                                                तुमचाच,
                                                                                                                                                                                                 अक्ष्या.

ता.क. - आपले काही photos सोबत आठवण म्हणून जोडतो आहे.

डावीकडून- सुरज सर,विनोद येरने,मी,नितीश,कौस्तुभ सर,पंकज 
डावीकडून- सुरज सर,पंकज ,राहुल,परवीन सर,मी,कौस्तुभ सर 

5 comments:

  1. Replies
    1. Hello, thank you for your interest.
      Suraj Sir is Left-most in both of the photos.
      His name was Suraj Surywanshi, had completed his MBBS and was IRS officer of 2016 batch.

      Delete
  2. अक्षय सुरजबद्दल वाचून हंबरडा फाेडून रडावसं वाटतय? छिंदवाड़ा माणसाची तिकडं देखील गरज आहे

    ReplyDelete
  3. अक्षय सुरजबद्दल वाचून हंबरडा फाेडून रडावसं वाटतय? छिंदवाड़ा माणसाची तिकडं देखील गरज आहे

    ReplyDelete
  4. अक्षय सुरजबद्दल वाचून हंबरडा फाेडून रडावसं वाटतय? छिंदवाड़ा माणसाची तिकडं देखील गरज आहे

    ReplyDelete